९० टक्के  काम पूर्ण होऊनही मनुष्यबळाअभावी अडथळे; नोव्हेंबपर्यंत काम पूर्णत्वास

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते विरार १५ डबा धिमा लोकल प्रकल्पाचे ९० टक्के  काम पूर्ण होऊनही टाळेबंदीत मनुष्यबळाअभावी रखडले आहे. आता पुन्हा या कामाला काहीशी गती देण्याचा प्रयत्न असून नोव्हेंबपर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरार पट्टय़ात प्रवाशांची संख्या वाढतच आहे. अंधेरी, बोरीवली, भाईंदर, मीरा रोड, विरारसारख्या स्थानकात प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीतला प्रवास जीवघेणाच ठरतो. हा प्रवास सुकर करण्यासाठी अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावरही १५ डबा लोकल चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाचा खर्च ५९ कोटी ५६ लाख रुपये आहे. या कामाला दोन वर्षांपूर्वीच सुरुवात करण्यात आली.

जानेवारी २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण के ला जाणार होता. परंतु अंधेरी, जोगेश्वरी, भाईंदर, वसई, विरार येथील काही तांत्रिक कामांत आलेल्या अडथळ्यांमुळे प्रकल्प एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले. त्यानुसार कामाला गती दिली जात असताना मार्च अखेरीसपासून टाळेबंदी लागली. यात रेल्वेत कं त्राटी पद्धतीवर असलेले कामगार हळूहळू परराज्यात गेले. त्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबले. टाळेबंदीच्या दोन महिन्यांनंतर प्रकल्पासाठी होणारी तरतूदही थांबली होती. परंतु रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा के ल्यानंतर निधी उपलब्ध झाला. गेल्या महिन्याभरापासून काही प्रमाणात मनुष्यबळही उपलब्ध झाल्याने पुन्हा अंधेरी ते विरार १५ डबा प्रकल्पाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकू र यांनी प्रकल्प याआधी जानेवारी व त्यानंतर एप्रिलपर्यंत पूर्ण के ला जाणार होता. परंतु हाच प्रकल्प आता नोव्हेंबपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती दिली.

प्रवाशांना उत्सुकता

* काही ठिकाणी रेल्वे यार्ड, रूळ, ओव्हरहेड वायर अशी छोटी तांत्रिक कामे राहिली आहेत. तर अंधेरी ते विरार मार्गावरील फलाटांची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे नोव्हेंबपर्यंत कामे पूर्ण होतील. नोव्हेंबरनंतर लोकल सर्वच प्रवाशांसाठी खुली होईल.

* सध्या पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणू, विरारसाठी १५ डबा जलद लोकल चालविल्या जातात. अंधेरी ते विरार १५ डबा धिम्या लोकल चालविल्यास प्रवाशांना त्याचा फायदा मिळेल.