News Flash

अनिल देशमुख यांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव

कारवाईपासून तातडीचा दिलासा देण्याची मागणी केली होती.

संग्रहीत

मुंबई :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी दाखल गुन्ह्यसाठी कठोर कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

आपल्यावरील आरोप खोटे असून सीबीआयने सुडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा दावा करत तो रद्द करण्याच्या मागणीसाठी देशमुख यांनी याआधीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच कारवाईपासून तातडीचा दिलासा देण्याची मागणी केली होती. त्या वेळी देशमुख यांची तातडीचा दिलासा देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली होती. मात्र त्याचवेळी आवश्यकता पडल्यास देशमुख कारवाईपासून दिलासा मिळवण्याच्या मागणीसाठी सुट्टीकालीन न्यायालयात दाद मागू शकतात, असेही न्यायालायने स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी पुन्हा कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी सुट्टीकालीन न्यायालयात धाव घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 1:56 am

Web Title: anil deshmukh again moves bombay high court zws 70
Next Stories
1 मानव विकासअंतर्गत एसटीला १९७ कोटी रुपये
2 मुंबई, ठाण्यात रुग्णसंख्या एक हजाराखाली
3 बालगोपाळांसाठी ‘मधली सुट्टी’चा ज्ञानखजिना आजपासून
Just Now!
X