25 September 2020

News Flash

‘कोचिंग क्लासेसचे मालक आणि विनोद तावडे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण’

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप

कोचिंग क्लासेसचे मालक आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवण झाल्यानेच खासगी शिकवणीचा मसुदा पडून आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं आणि खासगी शिकवणीसंबंधीच्या मसुद्याला त्वरित मंजुरी द्यावी अशीही मागणी देशमुख यांनी केली आहे.

गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला शॉपिंग सेंटरला आग लागून २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेकडे लक्ष वेधत महाराष्ट्रात १ लाख १० हजारांच्यावर कोचिंग क्लास आहेत. ज्यापैकी ३० ते ३५ हजार कोचिंग क्लासेस मुंबईत आहेत. त्यांचे फायर ऑडिट झालेले नाही असाही आरोप देशमुख यांनी केला. आग लागली तर बाहेर पडण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही नाही असंही देशमुख यांनी म्हटलं आहे. सुरतसारखी घटना महाराष्ट्रात किंवा मुंबईत कुठेही घडू शकते अशीही भीती देशमुख यांनी व्यक्त केली.

२०१७ मध्ये कोचिंग क्लासेसवर नेमण्यात आलेल्या समितीवर विधानसभेत चर्चा झाली होती. १२ लोकांच्या मदतीने हा मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र त्याचे रूपांतर अद्याप कायद्यात होऊ शकलेले नाही. लवकरात लवकर यासंबंधीचा कायदा करू असे आश्वासन तावडे यांनी दिले होते मात्र ते त्यांनी पाळले नाही असेही देशमुख यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे या सगळ्यांचीही उपस्थिती होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 4:55 pm

Web Title: anil deshmukh allegations against vinod tawade on coaching classes issue
Next Stories
1 हेड मसाज देताना कंबर पकडली, अभिनेत्रीचा हेअर स्टायलिस्टवर आरोप
2 मुंबईतल्या गोरेगावमध्ये आरे फ्लाय ओव्हरवर तेलाच्या टँकरने घेतला पेट
3 पश्चिम रेल्वे बदलणार लेडीज डब्यावरच्या ‘स्त्री’ची ओळख
Just Now!
X