News Flash

“हॉस्पिटलबाहेरच पत्रकारांशी बोललो”; ‘त्या’ पत्रकार परिषदेवर आता अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण!

१५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेवर अनिल देशमुखांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख

परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आज सकाळपासून राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेची चर्चा सुरू झाली आहे. सकाळी शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत “परमबीर सिंग यांनी उल्लेख केलेल्या दिवसांमध्ये अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते”, असं म्हणत पाठराखण केल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचे ट्विट रीट्विट करत शरद पवारांनाच उलट सवाल विचारण्यात येत आहेत. त्यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा करणारं स्पष्टीकरण दिलं आहे.

“…म्हणून विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीला आधारच नाही”, शरद पवार

काय म्हणाले अनिल देशमुख?

१५ फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हिडीओ विरोधकांकडून ट्वीट केले जात असताना अनिल देशमुखांनी ती पत्रकार परिषद रुग्णालयाबाहेरच घेतली असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “मला कोविड झाल्यामुळे मी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. १५ फेब्रुवारीला माझा डिस्चार्ज झाला. त्यावेळी मी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना गेटवर काही पत्रकार होते. त्यावेळी माझ्या अंगात त्राण नव्हता. तेव्हा मी हॉस्पिटलमध्येच खुर्चीवर बसलो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर मी घरी जाऊन होम क्वारंटाईन झालो. १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाईन होतो. २८ फेब्रुवारीला मी पहिल्यांदा बाहेर पडत सह्याद्री गेस्टहाऊसला मीटिंगला गेलो”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

देशमुख क्वारंटाईनमध्ये होते, तर मग ‘हे’ नेमके कोण आहेत?; फडणवीसांचा पवारांना सवाल

काय आहे आक्षेप?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात फेब्रुवारीच्या मध्यावर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी बोलावून पैसे वसुलीचं टार्गेट दिल्याची माहिती काही पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, या काळात अनिल देशमुख करोनाच्या उपचारांसाठी रुग्णालयात होते, असा खुलासा शरद पवारांनी केला.

 

यानंतर विरोधकांनी अनिल देशमुख यांनी १५ तारखेलाच घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हिडीओ पोस्ट करत जाब विचारायला सुरुवात केली. यामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश आहे. त्यावर आता अनिल देशमुखांकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 2:32 pm

Web Title: anil deshmukh on 15 february press conference allegation devendra fadnavis pmw 88
Next Stories
1 मी ‘बे’जबाबदार : मुंबईत ‘विनामास्क’वाल्यांकडून ४० कोटींची वसूली
2 प्रत्यक्ष परीक्षेस पालकांचाच विरोध; आणखी सुलभीकरणाचा आग्रह
3 जन्मठेप भोगणाऱ्या पोलीस शिपायासह दोघांना अटक
Just Now!
X