मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्य़ातील काही भाग वगळण्याच्या राज्य सरकारच्या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोरच होणार आहे.

याच प्रकरणाशी संबंधित स्वतंत्र याचिकेवरील सुनावणीच्या वेळी आपल्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्याबाबत न्यायमूर्ती शिंदे यांनी खेद व्यक्त केल्यावर मूळ  अ‍ॅड्. जयश्री पाटील यांनी प्रकरण अन्य खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी मागे घेतली. शिवाय न्यायमूर्ती शिंदे यांच्याविरोधात के लेली तक्रोर मागे घेण्याची हमीही दिली.

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्य़ात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे तसेच पोलीस नियुक्त्या-बदल्यांबाबतच्या आरोपांचा भाग वगळण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने याचिका केली आहे.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते.