12 August 2020

News Flash

‘अण्णाभाऊ साठे यांचे लवकरच मुंबईत स्मारक’

शताब्दीनंतरही अण्णाभाऊंची आठवण जिवंतपणा देते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून जनजागृती केली. त्यांच्या या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांची साहित्यसंपदा एका ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यादृष्टीने त्यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक सर्वांच्या सहकार्याने मुंबईत लवकरच उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केली.

मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर युरेशियन स्टडीज व रशियन विभागातर्फे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेच्या सांगता समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.शताब्दीनंतरही अण्णाभाऊंची आठवण जिवंतपणा देते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भाषा सातासमुद्रापार पोहोचविली. त्यांचे साहित्य अजूनही लोकप्रिय आणि अलौकिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:22 am

Web Title: annabhau sathes memorial in mumbai soon abn 97
Next Stories
1 बेस्टमधील २७ कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू
2 ‘दुधाला वाढीव दर न मिळाल्यास आंदोलन तीव्र’
3 …आता मास्क आणि सॅनिटाइजरच्या लुटमारीला लागणार चाप!
Just Now!
X