22 October 2020

News Flash

मुंबईत आणखी १,४३२ रुग्ण

दिवसभरात ३१ रुग्णांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत करोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असल्याचे चित्र असतानाच शनिवारी एक हजार ४३२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणीच्या अहवालावरून उघड झाले. दिवसभरात ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे पालिकेच्या चिंतेत भर पडली आहे.

आजघडीला मुंबईतील करोनाबाधितांची संख्या एक लाख ४३ हजार ३८९ वर पोहोचली आहे. मात्र रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८१ टक्क्य़ांवर पोहोचले आहे. विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेले ६८२ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत एक लाख १५ हजार ५०० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईतील सात हजार ५९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मृत्यू झालेल्या ३१ जणांपैकी २२ जणांना दीर्घ आजार होते. आजमितीस मुंबईत १९ हजार ९७४ उपचाराधीन रुग्ण आहेत.

करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे मुंबईतील ५५६ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत, तर पाच हजार ९१६ इमारती टाळेबंद करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 12:28 am

Web Title: another 1432 patients in mumbai abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 महानिर्मितीत संचालकपदाच्या नियुक्तीची घाई
2 धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करण्यासाठीच महाधिवक्त्यांचा सल्ला!
3 जेईई परीक्षार्थीना प्रवासचिंता
Just Now!
X