03 March 2021

News Flash

..आणखी २२२ लोकल फेऱ्या

पश्चिम मार्गावर वातानुकूलित उपनगरी रेल्वेही सेवेत

(संग्रहित छायाचित्र)

मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरी रेल्वेला (लोकल) वाढलेल्या गर्दीमुळे आज, १५ ऑक्टोबरपासून फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. मध्य रेल्वेवर आणखी २८ फेऱ्या, तर पश्चिम रेल्वेवर १९४ फेऱ्यांची भर पडेल. सात महिन्यांनंतर पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलही धावणार आहे.

सध्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल चालवल्या जात आहेत. परंतु कमी फे ऱ्यांमुळे प्रवाशांची गर्दी होते व अंतर निमय पाळले जात नाहीत. त्यामुळे फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची सूचनाही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. त्यानुसार राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत, कसारा मुख्य मार्ग, हार्बर आणि ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर सध्या ४५३ लोकल फेऱ्या होतात. त्यात १५ ऑक्टोबरपासून आणखी २८ फेऱ्यांची भर पडणार आहे. मुख्य मार्गावर १८ आणि हार्बर मार्गावर १० फेऱ्या असल्याचे सांगण्यात आले.

आणखी २१९ फेऱ्याही लवकरच वाढवून एकू ण ७०० पर्यंत फेऱ्या चालवण्याचे नियोजन असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. पश्चिम रेल्वेवरही १९४ फे ऱ्या चालवताना यामध्ये १० वातानुकू लित लोकल फे ऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे एकू ण फे ऱ्यांची संख्या ५०६ वरून ७०० पर्यंत पोहोचणार आहे.

मोनो सेवा रविवारपासून

* चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनो सेवा रविवार, १८ ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याचे एमएमआरडीएने सांगितले.

* राज्य शासनाने लागू केलेले सर्व नियम, तसेच मेट्रो सेवेवर असलेली उपाययोजना मोनोसाठीदेखील वापरण्यात येईल. अंतर नियम, एक सोडून एक आसनव्यवस्था, मोबाईल अप्ॉद्वारे तिकिट, क्यूआरकोडचा वापर अशा उपाययोजना करण्यात येणार असल्याचे असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:21 am

Web Title: another 222 local rounds abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मेट्रोसेवा सोमवारपासून
2 सहकारी संस्थांमध्ये निर्णयाचे सर्वाधिकार संचालक मंडळाला
3 ‘कोडिंग’ अनिवार्य असल्याच्या जाहिरातीवर बंदी
Just Now!
X