28 November 2020

News Flash

‘रिपब्लिक’विरोधात आणखी एक गुन्हा

पोलीस दलात दुफळी निर्माण करणे, त्यासाठी चिथावणी देणे आदी आरोप

(संग्रहित छायाचित्र)

पोलीस दलात दुफळी निर्माण करणे, त्यासाठी चिथावणी देणे आदी आरोप ठेवत मुंबई पोलिसांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीविरोधात शुक्रवारी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे रिपब्लिक वाहिनीविरोधात आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला. पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियमातील कलम ३(१)नुसार रिपब्लिक वृत्त वाहिनीच्या संपादकीय विभागातील कर्मचारी आणि वृत्त विभागाच्या प्रमुखाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत उपनिरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. गुरुवारी सायं. ७ च्या सुमारास रिपब्लिक वाहिनीवर एक वृत्त प्रसारित करण्यात आले. टीआरपी प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलीस दलात दोन गट निर्माण झाले आहेत. त्यापैकी एक गट पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात असून बंडाच्या पावित्र्यात आहे. हा मुंबई पोलिसांच्या विश्वासार्हतेला तडा आहे, अशी विधाने वृत्त देणाऱ्या प्रतिनिधी, वृत्त समालोचकांनी केली. या निराधार वृत्तामुळे पोलीस दलात अप्रीतीची भावना निर्माण होऊ शकते किं वा तशी भावना निर्माण व्हावी या हेतूने हे वृत्त प्रसारित करण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:37 am

Web Title: another crime against the republic tv abn 97
Next Stories
1 अमेरिकेच्या टेस्ला कंपनीला महाराष्ट्राकडून आमंत्रण
2 महापारेषणमध्ये ८,५०० पदांची भरती
3 प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याच्या भूमिकेला प्रतिष्ठितांचा पाठिंबा
Just Now!
X