19 September 2020

News Flash

मुंबईत आणखी एका शिवसेना पदाधिकाऱ्याची अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या

शिवसेनेच्या आणखी एका पदाधिकाऱ्याची मालाडमध्ये हत्या करण्यात आली आहे. सचिन सावंत यांच्यावर काही अज्ञात लोकांनी गोळ्या झाडल्या, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मालाडमध्ये शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची काही अज्ञातांनी गोळ्या झाडून रविवारी हत्या केली.

शिवसेनेच्या आणखी एका पदाधिकाऱ्याची मालाडमध्ये हत्या करण्यात आली आहे. सचिन सावंत यांच्यावर काही अज्ञात लोकांनी गोळ्या झाडल्या, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंबईच्या कुरारच्या गोकूळनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.

अहमदनगर आणि शहापूर येथे गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हेच हत्यांचे सत्र अद्यापही सुरुच आहे. कारण पुन्हा एकदा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाली असून सचिन सावंत असे त्यांचे नाव आहे. ते मालाडमधील शाखा क्रमांक ३९चे माजी उपशाखाप्रमुख होते. रविवारी संध्याकाळी बाईकवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अहमदनगरमधील केडगाव येथे पोटनिवडणुकीदरम्यान, दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. त्यानतंर काल (शनिवारी) भिवंडीमध्ये शहापूरचे शिवसेना तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह जाळण्यात आल्याची घटना समोर आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 10:39 pm

Web Title: another shiv sena officials shot dead by infiltrators in mumbai
Next Stories
1 अन् मुंबईच्या पहिल्या पोलीस कमिश्नरांचा शोध संपला !
2 परोपकाराची जाण! जीवदान देणा-याला रोज भेटायला येते ही घार
3 सायकल मार्गिका चालविण्यासाठी पालिकेची प्रायोजकांना साद
Just Now!
X