मुंबई : गडचिरोली भागातील नक्षलवाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नक्षलविरोधी अभियान राबवण्यासाठी राज्य पोलीस दलाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या हेलिकॉप्टरचे २ महिन्यांचे भाडे दोन कोटी ९६ लाख आहे.

गडचिरोली हा भाग नक्षलग्रस्त असल्याने आणि नक्षलवाद्यांनी तेथे वारंवार सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले केल्याने या भागात नक्षलविरोधी अभियान महाराष्ट्र पोलिसांनी हाती घेतले आहे.

त्यासाठी गडचिरोलीच्या दुर्गम भागात, जंगलांमध्ये टेहळणी व मदतकार्य करण्यासाठी हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे. मे. पवनहंस लि. या कं पनीकडून स्थिर मासिक भाडे व हवाई उड्डाणाचे तास या समीकरणांवर आधारित भाडेकरार करून हेलिकॉप्टर घेण्यात आले आहे.