ध्वनिप्रदूषण विरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांची शासनाकडे मागणी

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
stomach disorders, stomach disorders pollution
Health Special: प्रदूषणामुळे होणारे पोटाचे विकार कोणते?

मशिदीवरून दररोज होणाऱ्या ‘अजान’बद्दल तक्रारीचा सूर व्यक्त करणाऱ्या सोनू निगमनंतर केवळ मुस्लिमधर्मीयच नव्हे तर सर्वधर्मीय उत्सवांमुळे होणाऱ्या आवाजावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पुन्हा ‘आवाज फाऊंडेशन’तर्फे करण्यात आली आहे. धार्मिक स्थळे व शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनिप्रदूषणावर बंदी असूनही धार्मिक उत्सवांमुळे होणाऱ्या आवाजाच्या पातळीची आकडेवारी फाऊंडेशनने मुंबईचे पोलीस आयुक्त, पालिका आयुक्त, पर्यावरण खात्याचे सचिव आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांना सादर केली.

बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने मशिदीतील भोंग्यांबाबतची तक्रार ट्विटरवर व्यक्त केल्यावर समाजाच्या सर्वच स्तरातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र, समाजात होणारे ध्वनिप्रदूषण केवळ मशिदीतून नव्हे तर अन्य धर्मीयांच्या उत्सवातून होत असल्याची बाब पुन्हा पुढे आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ध्वनिप्रदूषण कोणत्याही कारणामुळे होत असले तरी त्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. मात्र, तरीही सर्वच समाजांकडून याचा भंग होत असल्याचे दिसून येते आहे. मानवी आरोग्यावर ९० डेसिबलवरील आवाजाने गंभीर परिणाम होतो आणि धार्मिक उत्सवातील आवाज तर १०० डेसिबलवरील आहेत. त्यामुळे त्या विरोधातील तक्रारींमध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे. परंतु, ज्यासाठी नागरिकांकडून अद्यापही हवा तितका प्रतिसाद मिळत नाही, असे ‘आवाज फाऊंडेशन’च्या सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितले. तसेच या घटनांकडे पुन्हा एकदा गांभीर्याने लक्ष देण्यासाठी आम्ही सोमवारी पुन्हा मुंबईचे पोलीस आयुक्त, पालिका आयुक्त, पर्यावरण खात्याचे सचिव आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव आदींना पत्र पाठवले असून सोनू निगमच्या ट्विटप्रमाणे केवळ एकाच धर्माच्या तक्रारीकडे लक्ष न देता अन्य धर्मीयांच्या तक्रारींकडेही लक्ष देण्याची विनंती केल्याचे अब्दुलाली यांनी स्पष्ट केले.

dhol-speaker-chart

मोठय़ा आवाजांचा आणि प्रत्येक धर्मातील सणांचा काडीमात्र संबंध नाही. मात्र, आपल्याकडील सण साजरे करण्याची बदलेली वृत्ती आणि प्रवृत्ती यांमुळे ध्वनिप्रदूषण होताना दिसते. यामुळे अशा विषयावर सोनू निगमसारख्या सुप्रसिद्ध व्यक्तीने आवाज उठवला ही चांगली बाब आहे. कारण, राजकीय व्यक्ती या दुटप्पी असतात; परंतु समाजाला अशा सुप्रसिद्ध व्यक्तींनी उत्तम सल्ला दिला तर समाज त्याकडे सकारात्मकतेने पाहील.

डॉ. महेश बेडेकर, याचिकाकर्ते