02 March 2021

News Flash

सहाय्यक पोलीस निरीक्षकाची दुसऱ्या पत्नीकडून हत्या

सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार टाकसाळकर (४३) यांची रविवारी दुपारी हत्या करण्यात आली. टाकसाळकर यांची दुसरी पत्नी पार्वती (३६) हिने त्यांच्या डोक्यावर कडप्प्याचा तुकडा आणि

| April 29, 2013 03:21 am

सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार टाकसाळकर (४३) यांची रविवारी दुपारी  हत्या करण्यात आली. टाकसाळकर यांची दुसरी पत्नी पार्वती (३६) हिने त्यांच्या डोक्यावर कडप्प्याचा तुकडा आणि हातोडा घालून त्यांची हत्या केली.
मुंबई पोलिसांच्या शस्त्रास्त्र विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार टाकसाळकर हे मरोळच्या पोलीस वसाहतीत राहत होते. त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला सोडले होते आणि गेल्या काही वर्षांपासून ते पार्वती हिच्यासोबत राहत होते. पार्वतीने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. टाकसाळकर यांच्या पहिल्या पत्नीने त्यांच्या विरोधात भांडुप पोलीस ठाण्यात ४९८ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्री पार्वती आणि टाकसाळकर यांच्यात भांडण झाले. रविवारी पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर मद्यपान करून टाकसाळकर झोपून गेले होते. त्यानंतर पार्वतीने कडप्प्याचा तुकडा आणि हातोडय़ाने झोपेत असलेल्या टाकसाळकर यांच्यावर वार केले आणि आपणहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी दिली. ही घटना घडली तेव्ही पार्वती हिचा १४ वर्षांचा मुलगा घरात होता. टाकसाळकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. टाकसाळकर यांना पहिल्या पत्नीपासून मुलगा असून ती भांडुपला राहते.
पार्वतीच्या चारित्र्यावर संशय
नंदकुमार टाकसाळकर यांनी पहिली पत्नी असतानाच विवाहीत असलेल्या पार्वतीशी प्रेमसंबंध जुळवले होते. त्यामुळे पहिल्या पत्नीला सोडून ते पार्वतीसोबत राहत होते. डिसेंबर २०१२ मध्ये टिटवाळा येथे त्यांनी पार्वतीशी विवाह केला होता. परंतु पहिल्या पत्नीशी घटस्फोट दिला नसल्याने हा विवाह बेकायदेशीरच होता. पार्वती हिच्यावरही टाकसाळकर यांचा संशय होता. त्यातूनच त्यांची भांडणे होत होती. रविवारीही याच कारणामुळे दोघांमध्ये भांडणे झाली आणि त्याचे पर्यवसान टाकसाळकर यांच्या हत्येत झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 3:21 am

Web Title: api murdered by his second wife
Next Stories
1 महापालिकेच्या भाषिक शाळांना घरघर:
2 तरुणीचे अपहरण करून बलात्कार
3 भरधाव त्रिकुटाला रोखणाऱ्या वाहतूक पोलिसास उडविले
Just Now!
X