श्री षण्मुखानंद मेडिकल सेंटरच्या ४० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सोमवार, २३ मार्च रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माऊंट एव्हरेस्ट’ शिखर सर करणारी कुमारी माल्वत्था पूर्णा ही १३ वर्षांची मुलगी आणि शंभरी पार केलेल्या दोन वृद्धांचा सत्कार करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या खास उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
लतीफाबाई खान (१०८) आणि रामप्यारी गुप्ता (१०५) अशी या दोन वृद्ध महिलांची नावे आहेत. तसेच मालती व्यंकटेशन आणि चेन्नई येथे ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपक्रम राबविणारे पोलीस अधिकारी एस. शिवानंदन यांनाही या वेळी गौरविण्यात येणार आहे. प्रत्येकी एक लाख रुपये, समई आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.