सीएसएमटी, एलटीटी स्थानक परिसरात लवकरच सुरुवात

मुंबई: मेल-एक्स्प्रेसमधून आलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी आणि एलटीटी स्थानकाच्या हद्दीत खासगी बससेवा दिली जाणार आहे. अ‍ॅपवर आधारित सेवा सुरू करण्यासाठी खासगी कं पन्या ही सेवा उपलब्ध करून देणार असून त्यासाठी मध्य रेल्वेकडून जागा उपलब्ध के ली जाणार आहे.

नुकतेच कु र्ला स्थानक हद्दीत बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकीची सेवा सुरू करण्यात आली आहे. स्थानकाबाहेर येताच प्रवाशांना कु र्ला ते बीके सी परिसरात या दुचाकीवरून जाण्यासाठी २५ रुपये भाडे आकारले जात आहे. याबरोबरच विजेवरील गाडय़ांसाठी सीएसएमटी स्थानकात चार्जिगची सोयदेखील के ली आहे. यातून रेल्वेला उत्पन्न मिळत आहे. आता खासगी बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जात आहेत. बससेवा मोबाईल अ‍ॅपवर आधारित असेल. त्यावरून प्रवासी आसन आरक्षित करू शकतील. ही सेवा सुरू करण्यासाठी निविदा पुढील महिन्यात खुली करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये मोठय़ा किंवा छोटय़ा आकारातील वातानुकू लित बस असतील.

सीएसएमटी स्थानकाच्या फलाट १८च्या दिशेला  आणि एलटीटी स्थानकाबाहेरही मोकळी जागा आहे. या दोन्ही स्थानकाच्या जागेत मेल-एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांसाठी खासगी बससेवा सुरू करण्याचा विचार सुरू आहे.

उत्पन्नाचा स्रोत

रेल्वेकडून उत्पन्नावाढीसाठी विविध पर्याय शोधले जात आहेत. यात रेल्वे हद्दीतील मोकळ्या जागा व्यवसायासाठी खासगी कं पन्यांना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अ‍ॅप आधारित वाहन सेवा खासगी कंपन्यांना उपलब्ध करून देतानाच प्रवाशांची सोयीबरोबरच उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने सुरू केला आहे.

ई बाइकची चलती

सध्या ठाणे स्थानक हद्दीत खासगी कं पन्यांना ई-रिक्षा सेवेसाठी जागा उपलब्ध के ल्यानंतर कु र्ला स्थानक हद्दीत बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकींची सेवा सुरू झाली आहे. आता सीएसएमटी, भायखळा, परेल, दादर, मुलुंड, भांडुप स्थानक हद्दीतही ई-बाइक सेवा सुरू होणार आहे.