News Flash

इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे आवाहन

मालाडमध्ये इमारत पडून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचे जीव गेल्यानंतर पालिकेची विभाग कार्यालये सावध झाली आहेत.

मालाड दुर्घटनेमुळे डी विभाग कार्यालय सजग

मुंबई : मालाडमध्ये इमारत पडून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचे जीव गेल्यानंतर पालिकेची विभाग कार्यालये सावध झाली आहेत. ग्रँटरोड, नानाचौक परिसर असलेल्या डी विभाग कार्यालयाने रहिवाशांना इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करवून घेण्याचे आवाहन के ले आहे. धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्कालीन नियंत्रण कक्षाला कळवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मुंबईतील सर्वाधिक जुन्या व उपकर प्राप्त इमारतींची संख्या शहर भागात जास्त आहे. त्यामुळे शहर भागात इमारती पडण्याचा धोका असतो. तसेच ३० वर्षे जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्याची स्थिती तपासण्याचे पालिके चे धोरण आहे. पालिके च्या संकेतस्थळावर संरचनात्मक परीक्षण करणाऱ्या परीक्षकांची यादी दिली जाते. या परीक्षकांकडून रहिवाशांनी आपल्या इमारतीचे परीक्षण करून त्याचा अहवाल पालिकेला सादर करायचा असतो. त्यानुसार इमारत धोकादायक आहे का हे पाहून इमारतींच्या स्थितीनुसार त्याची वर्गवारी के ली जाते. तसेच आपल्या परिसरातील इमारतींना धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास अथवा तसे निदर्शनास आल्यास आपल्या तक्रारी / सूचना तातडीने दूरध्वनीद्वारे द्याव्यात. आपत्कालीन कक्ष पूर्णवेळ कार्यरत असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२२ – २३८६४००० असा आहे. तर पालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक ‘१९१६’ असा आहे.

पालिकेच्या सूचना

डी विभागाने रहिवाशांना के ले आहे की आपल्या इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करून त्याचा अहवाल ‘डी विभाग’ कार्यालयास सादर करावा. जेणेकरून, भविष्यात धोकादायक इमारतींची वर्गवारी करून पुढील कारवाई  ‘बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८’, च्या कलम ३५४ नुसार करण्यात येईल. तसेच अहवालाद्वारे भविष्यातील होणारी जीवित व वित्त हानी टाळता येऊ शकेल; हे लक्षात घेता संरचनात्मक परीक्षण करवून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 3:14 am

Web Title: appeal structural inspection buildings ssh 93
Next Stories
1 बालकामगारविरोधी दिनानिमित्त खास खेळ
2 मुंबईतील निर्बंध कायम
3 शरद पवार- प्रशांत किशोर भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण
Just Now!
X