कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २४ फेब्रुवारीला काढलेल्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र अर्जदारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ‘म्हाडा’तर्फे करण्यात आले.

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळातर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या सोडतीत विरार-बोळींज, मीरा रोड, कावेसर-ठाणे, बाळकुम-ठाणे व वेंगुर्ला-सिंधुदुर्ग येथील ४२७५ सदनिकांचा समावेश होता. या सोडतीतील यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी २० मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत ३१ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, ज्या यशस्वी अर्जदारांना सूचना पत्रे मिळाली नाहीत त्यांनी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयातील कोकण मंडळाच्या खोली क्र. २५४/२५५ येथील पणन कक्षात मिळकत व्यवस्थापक २, ३, ४ यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा अन्यथा ६६४०५०२६ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी केले.