जयेश शिरसाट

पोलिसांविरोधातील तक्रोरींचा निपटारा करणाऱ्या, सत्र न्यायालयाप्रमाणे अधिकार प्राप्त असलेल्या प्राधिकरणावर गृह विभागाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची परस्पर नियुक्ती   करण्यात आली आहे. विशेष अधिकार वापरून ही नियुक्ती केल्याचे गृहमंत्रालयातील उच्चपदस्थांनी स्पष्ट केले.

राजकुमार ढाकणे यांची १४ जुलैला राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्यपदी (नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती) नियुक्ती करण्यात आली. हा निर्णय गृह विभागाचे प्रधान सचिव(विशेष) अमिताभ गुप्ता यांनी अधिसूचनेद्वारे जारी केला. या पदावर नियुक्त होणाऱ्यास सातव्या वेतन आयोगानुसार मासिक दोन लाख ७९ हजार इतक्या वेतनाची तरतूद आहे.

या पदासाठी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात गृह विभागाने वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुकांचे अर्ज मागवले होते. ३ ते ९ डिसेंबर या कालावधीत नरिमन पॉईंट येथील प्राधिकरणाच्या कार्यालयात अर्ज करणे आवश्यक होते. इच्छुकाचे नाव, गाव, पत्ता, अनुभव, व्यवसाय आदी तपशीलांसोबत फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबत, न्यायालयीन    किंवा फौजदारी कारवाई  सुरू नसल्याबाबत, कारवाई करण्यात आली नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक होते. माहिती अधिकारातून हाती आलेल्या कागदपत्रांनुसार या जाहिरातीला अनुसरून १३ इच्छुकांनी अर्ज के ले. मुदतीत आलेले १३ आणि विलंबाने प्राप्त झालेला एक अशा एकू ण १४ जणांचे अर्ज निवड प्रक्रियेसाठी प्राधिकरणाने गृहविभागाला सुपूर्द  केले. मात्र त्यात ढाकणेंचे नाव नाही. (संबंधित कागदपत्रे लोकसत्ताकडे आहेत)

ढाकणे यांच्याविरोधात २०१४-१५मध्ये पुण्यातील कोरेगाव पार्क आणि विमानतळ पोलीस ठाण्यांत दोन गुन्हे नोंद आहेत. यापैकी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्य़ात ‘हत्येचा प्रयत्न’ या कलमाचा समावेश आहे. पोलिसांच्या ताब्यातून पळ काढल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. ते पोलिसांच्या तावडीतून पसार झाले. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फे टाळला होता. (आदेशाची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे) या खटल्याची सुनावणी अद्याप सुरू आहे. या नियुक्तीबाबत गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी प्रतिक्रि या देणे टाळले. त्यांच्यावतीने अवर सचिव जयंत जानबंधू यांनी प्रतिक्रि या दिली. जाहिरात दिली तेव्हा आधीचे सरकार जाऊन नवे सरकार सत्तेत आले होते. गृह विभागाने स्वत:च्या अधिकारकक्षेत ही नियुक्ती केली, असा दावा त्यांनी केला. ढाकणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत याबाबत माहिती नव्हती, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.