पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावे असलेल्या सातारा जिल्ह्य़ातील उपसा सिंचन योजनेच्या सुमारे २५० कोटींच्या वाढीव खर्चास राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दोन वर्षांत दुसऱ्यांदा या योजनेच्या वाढीव खर्च मंजूर करण्यात आला आहे.

लक्ष्मणराव इनामदार हे पंतप्रधान मोदी यांच्या गुरुस्थानी होते.  इनामदार हे सातारा जिल्ह्य़ातील असल्याने या जिल्ह्य़ातील उपसा सिंचन योजनेस त्यांचे नाव देण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इनामदार यांच्या नावे असलेल्या योजनेच्या सुमारे २५० कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली. १९९७ मध्ये सातारा जिल्ह्य़ातील या योजनेच्या २६९ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये फडणवीस सरकारने १०८५ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास मान्यता दिली होती.