News Flash

राज्याच्या कृषी पर्यटन धोरणास मान्यता

पर्यटन केंद्रांना पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय आणि नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यात कृषी पर्यटन धोरण राबविण्यास रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास, शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करणे, कृषी पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे, गावातील महिला तरुणांना रोजगाराची संधी देणे, लोककला आणि परंपरांचे दर्शन  पर्यटकांना प्रत्यक्ष शेतीतील कामाचा अनुभव देणे, प्रदूषणमुक्त व निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनुभव देणे असा या धोरणाचा उद्देश आहे.

यासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, शेतकऱ्यांच्या भागीदारी संस्था किंवा कंपन्या या कृषी पर्यटन केंद्र उभारू शकतात. या पर्यटन केंद्रांना पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यांच्या आधारे शेतकऱ्यांना बँक कर्ज मिळू शकेल.

कृषी पर्यटन सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन एकर ते पाच एकर पर्यंत शेतीचे क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी निवास, भोजन व स्वयंपाक घराची व्यवस्था असणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर तसेच प्रादेशिक उपसंचालक, पर्यटन संचालनालय कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कृषी पर्यटन केंद्रासाठी प्रथम नोंदणी २५०० रुपये इतकी असून दर पाच वर्षांनी १००० रुपये इतके नूतनीकरण शुल्क आकारले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:13 am

Web Title: approval of state agro tourism policy abn 97
Next Stories
1 करोना चाचण्यांबाबत मुंबईकरांचा निरुत्साह
2 चोरांच्या झटापटीत महिला जखमी
3 लोकलसाठी सर्वसामान्यांचा वारंवार उद्रेक
Just Now!
X