News Flash

“आणखी एक दिलासा! मुंबईत ‘जम्बो कोविड’ सेंटरसाठी केंद्राकडून परवानगी”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं ट्विट; पंतप्रधान मोदींचे मानले आभार

संग्रहीत छायाचित्र

राज्याती वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिविर इंजकेश्नसह लस तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेळोवेळी केंद्र शासनाकडे आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तर, केंद्र सरकारकडून देखील महाराष्ट्रासाठी शक्य त्या सर्वप्रकारे मदत केली जात असल्याचे दिसून येत आहे. आता महाराष्ट्र शासनाने केलेल्या विनंतीनुसार केंद्र सरकारकडून मुंबईत जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

“महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अतिशय आभारी आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, “या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेड येथे उपलब्ध होऊन करोनाबाधितांवर उपचार होऊ शकतील.” असं फडणवीस म्हणाले आहेत.

“महाराष्ट्राला सर्वाधिक १७८४ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा”; फडणवीसांचा दावा!

याचबरोबर “बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर्स भरून देण्याची सुद्धा तयारी दर्शविली आहे. यामुळे सुद्धा मोठा दिलासा महाराष्ट्राला मिळेल.” अशी देखील फडणवीस यांनी माहिती आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 6:28 pm

Web Title: approval to set up a jumbo covid centre near bpcl refinery mumbai on maharashtragovts request devendra fadnavis msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुंबई : लॉकडाउनमध्ये विनामास्क क्रिकेट खेळणं भोवलं; न्यायालयाने नाकारला जामीन!
2 Virar Hospital Fire : विजयवल्लभ रुग्णालय आग प्रकरणात व्यवस्थापकासह दोघांना अटक
3 मुंबईतील ज्येष्ठ छायाचित्रकार विवेक बेंद्रे यांचं करोनामुळे निधन
Just Now!
X