मध्य रेल्वेला चित्रीकरणातून १ कोटी ३३ लाखांचे उत्पन्न

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकानंतर मध्य रेल्वेवरील आपटा रेल्वे स्थानक बॉलीवूडकरांसाठी सर्वात लोकप्रिय चित्रीकरण स्थळ आहे. २०१९-२० मध्ये आपटा स्थानकात चार चित्रपटांचे चित्रीकरण झाले असून सीएसएमटीत आठ चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. मध्य रेल्वेला चित्रीकरणातून १ कोटी ३३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
swatantra veer savarkar budget
रणदीप हुड्डाने ज्यासाठी मालमत्ता विकली, त्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं मूळ बजेट किती? जाणून घ्या
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

२०१९-२०२० या आर्थिक वर्षांत आपटा रेल्वे स्थानकावर रात अकेली है, मुंबई सागा आणि शुभ मंगल झायदा सावधान यासह चार चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लोकप्रिय चित्रपट पंगा, चोक्ड आणि सूरज से मंगल भारी इत्यादी आठ चित्रपटांचे चित्रीकरण झाले. पूर्वी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, रंग दे बसंती, बागी, खाकी, शादी नंबर १, चाइनाटाऊन आणि बॉक्स ऑफिसवरच्या अनेक लोकप्रिय चित्रपटांसह आपटा स्टेशन असंख्य चित्रपटांमध्ये दिसून आले. आपटा हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखले जाते. वळणदार रेल्वे रूळ आणि प्लॅटफॉर्मसह असलेले स्थानक पनवेल ते रोहा मार्गावर आहे. प्रवाशांची कमी गर्दी असलेले असे स्थानक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी योग्य स्थान असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. आपटा रेल्वे स्थानकावर  काही गाडय़ांना थांबा देण्यात आला आहे आणि ते क्रॉसिंग स्टेशन असल्याकारणाने आणखी एक जादा रूळ असून चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आरक्षित केलेल्या विशेष गाडय़ांच्या हालचालींसाठी जास्त सोयीचे आहे. आपटा स्थानक फिल्म सिटी, मुंबईपासून सुमारे ७५ कि.मी. अंतरावर असून प्रवास फक्त २ तासांचा आहे. त्यामुळे वेब मालिका, माहितीपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासाठी आपटा रेल्वे स्थानक सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनल्याचे सुतार म्हणाले. चित्रीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  स्थानकापासून ते आपटा, पनवेल, चौक, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारा आणि तुर्भे आणि वाडी बंदरसारख्या  रेल्वे स्थानकांपर्यंत  सर्वात जास्त पसंतीची चित्रपटाच्या चित्रीकरणाची स्थळे आहेत.

मध्य रेल्वेने २०१९-२० मध्ये २१ चित्रपटांच्या चित्रीकरणातून १ कोटी ३३ लाख रुपये उत्पन्न मिळविले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक येथे ‘पंगा’ चित्रपटासह ८ चित्रपटांच्या चित्रीकरणातून ४४ लाख ५२ हजार रुपये, आपटा स्थानकात चार चित्रपटांच्या चित्रीकरणातून २२ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळविले.

तर पनवेल स्थानकात चित्रीकरण करण्यात आलेल्या रजनीकांत अभिनित चित्रपट ‘दरबार’कडून सर्वाधिक २२ लाख १० हजार रुपये, पुणे विभागातील निसर्गरम्य वाठार स्थानकात सलमान अभिनित ‘दबंग ३’मधून १५ लाख ६२ हजार आणि अन्य ३ चित्रपटांमधून ३७ लाख २२ हजार रुपये उत्पन्न प्राप्त झाले. तर अन्य चित्रपटांच्या चित्रीकरणातूनही उत्पन्न मिळाले आहे.