22 August 2019

News Flash

चौकशी संपवून बाहेर आल्यानंतर अरबाज खान म्हणाला….

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने समन्स बजावल्यानंतर अरबाज खान शनिवारी चौकशीसाठी हजर झाला.

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने समन्स बजावल्यानंतर अरबाज खान शनिवारी चौकशीसाठी हजर झाला. त्याने तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. पोलिसांनी माझी जबानी नोंदवून घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांना माझ्याकडून ज्या प्रश्नांची उत्तरे हवी होती. ती माहिती मी त्यांना दिली. मी पोलिसांना यापुढेही तपासात सहकार्य करेन असे चौकशी संपल्यानंतर अरबाजने तिथून निघताना सांगितले.

आम्ही अरबाज खानची जबानी आज नोंदवून घेतली. त्याने तपासात पूर्ण सहकार्य केले. मी चौकशीबद्दल आता काहीच माहिती देणार नाही. गरज पडली तर आम्ही त्याला परत बोलवून घेऊ असे या प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी प्रदीप शर्मा यांनी सांगितले.

ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने १५ मे रोजी डोंबिवलीतून सट्टेबाजी रॅकेट चालवणाऱ्या चौघांना अटक केली. त्यानंतर भारतातील सट्टा बाजारातील मोठे नाव असलेला कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालान याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने २९ मे रोजी अटक केली. त्याच्या चौकशीतून अरबाज खानचे नाव समोर आले.

दरम्यान अरबाज खानने शनिवारी चौकशी दरम्यान सोनू जालानकडे आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी करत असल्याची कबुली दिली. मागच्या सहावर्षांपासून अरबाज आयपीएल सामन्यांवर सट्टा लावत होता. या सट्टेबाजीमध्ये अरबाजचे २.८० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अरबाज सोनू जालानला ३ कोटी रुपये देणे होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. पैसे दिले नाहीस तर नाव उघड करण्याची धमकी सोनूने अरबाजला दिली होती.

First Published on June 2, 2018 5:22 pm

Web Title: arbaaz khan betting racket sonu jalan pradeep sharma