News Flash

अभिनेता अरमान कोहलीला अटक! घरात सापडल्या स्कॉच व्हिस्कीच्या ४१ बाटल्या

उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी अभिनेता अरमान कोहलीला अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री अरमानच्या जुहू येथील घरावर छापा मारला.

अरमान कोहली

उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी अभिनेता अरमान कोहलीला अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री अरमानच्या जुहू येथील घरावर छापा मारला. त्यावेळी त्याच्या घरात स्कॉच व्हिस्कीच्या ४१ बाटल्या सापडल्या. अरमानच्या घरात स्कॉच व्हिस्कीच्या नियमापेक्षा जास्त बाटल्या आढल्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

कायद्यानुसार कुठलीही व्यक्ती स्कॉच, व्हिस्की, रम यासारख्या हार्ड लिकरच्या  १२ पेक्षा जास्त बाटल्या महिन्याभरापेक्षा जास्तकाळ स्वत:जवळ बाळगू शकत नाही तसेच परदेशातून येताना स्कॉच व्हिस्कीच्या दोन बाटल्या आणण्याची परवानगी आहे. अरमान कोहलीकडे ज्या दारुच्या बाटल्या सापडल्या. त्यातील बहुतांश बाटल्या या परदेशात खरेदी करण्यात आल्या आहेत.

उत्पादन शुल्क विभागाच्या वांद्र येथील कार्यालयात अरमान कोहलीची चौकशी करण्यात आली. अलीकडेच सांताक्रूझ पोलिसांनी अरमान कोहलीला प्रेयसीला मारहाण केल्या प्रकरणी अटक केली होती. पण नंतर तिने तक्रार मागे घेतली. अरमान प्रसिद्ध निर्माते राजकुमार कोहली यांचा मुलगा असून त्याच्या वडिलांनी १९९२ साली विरोधी या चित्रपटातून त्याला चित्रपटसृष्टी लाँच केले होते.

त्यानंतर जानी दुश्मन: एक अनोखी कहानी, एलओसी कारगिल या चित्रपटात अरमानने काम केले. पण अरमानला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर तो बिग बॉसच्या सातव्या पर्वात दिसला होता. विदेशी मद्य बाळगण्याच्या प्रकरणात अरमान कोहली दोषी सापडला तर त्याला दंडासह तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2018 1:16 pm

Web Title: armaan kohli arrested in case of scotch whisky
Next Stories
1 भांडण मिटलं?, लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाईजान प्रियांकाच्या रिसेप्शन पार्टीत!
2 VIDEO : रिसेप्शन पार्टीत दीपिका-प्रियांकाचा ‘पिंगा’
3 ज्येष्ठ संगीतकार लक्ष्मीकांत यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार
Just Now!
X