News Flash

महिलेवर बलात्कार करणाऱ्या तरुणास अटक

फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून एका ४० वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या वसीम शेख (२७) या तरुणास नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ५

| April 3, 2013 04:22 am

फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून एका ४० वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या वसीम शेख (२७) या तरुणास नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
व्यवसायाने संगणक अभियंता असलेल्या वसीमची सात महिन्यांपूर्वी मुंबईत राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेशी फेसबुकवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर त्यांच्या मैत्रीत झाले. त्याचाच फायदा घेत त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून ठाणे येथील पाचपखाडी भागात असलेल्या मित्राच्या कार्यालयामध्ये आणले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीनुसार, नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 4:22 am

Web Title: arrest to one in rape case
Next Stories
1 कबीर कलामंचच्या दोन कलाकारांचे मुंबईत आत्मसमर्पण
2 आदिवासी मुलांच्या कपडे खरेदीतही काळेबेरे
3 रिझर्व्ह बॅंकेत घुसण्यासाठी माथेफिरूचे एअरगनने हवेत फायरिंग
Just Now!
X