गांधीनगर भागात सोमवारी सकाळी रिक्षामधून कामावर जात असलेल्या युवतीचा एका तरूणाने साथीदाराच्या मदतीने विनयभंग केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. आनंद रामकेर चौधरी (२३), असे तरूणाचे नाव असून तो गांधीनगर भागात राहतो. याच भागात राहणारी २२ वर्षीय युवती सोमवारी सकाळी रिक्षामधून कामावर जात होती. त्यावेळी आनंद त्याच्या साथीदारासह मोटारसायकलवरून आला व रिक्षामध्ये जाऊन बसला. त्यानंतर त्याने रिक्षाचालकास उपवन येथे रिक्षा नेण्यास सांगितले व युवतीचा विनयभंग केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एकतर्फी प्रेमातून त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2013 9:17 am