News Flash

त्या रात्री नेमकं काय घडलं?; एनआयएने सचिन वाझेंना अंबानींच्या घराबाहेर कुर्ता घालून चालायला लावलं

एनआयएकडून नाट्य रुपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरु आहे. तपासाचा भाग म्हणून सचिन वाझे यांना शुक्रवारी रात्री अंबानींचं निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर आणण्यात आलं होतं. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएकडून या ठिकाणी नाट्य रुपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

२५ फेब्रुवारीला अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडी बेवारस अवस्थेत आढळली. पुढे त्यात अडीच किलो जिलेटीन आणि अंबानी कुटुंबाला धमकावणारी चिठ्ठी आढळली. या परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाचे विश्लेषण केले असता ही स्कॉर्पिओ वाझे यांनी चालवत आणली आणि अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ, कारमायकल रोडवर उभी केली, असा संशय ‘एनआयए’ला आहे. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर एनआयएने हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून आपल्याकडे घेतलं असून तपास सुरु आहे.

एनआयएने सचिन वाझे यांना स्कॉर्पिओ सापडली तिथपर्यंत चालायला लावसं. आधी सचिन वाझेंना शर्ट आणि पँटमध्ये चालायला सांगण्यात आलं. नंतर त्यांना कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधून चालायला लावण्यात आलं. सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आणि सचिन वाझे यांच्यातील साधर्म्या तपासण्याचा प्रयत्न एनआयकडून करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

एनआयएने सचिन वाझे वापरत असलेल्या वाहनात गाडीची नंबरप्लेट सापडल्याचा दावा केला आहे. तसंच अँटिलियाबाहेर त्या रात्री सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचाही दावा आहे.

वाझेंकडे १२ गाड्या
एनआयए आणि एटीएसच्या तपासात वाझे एकूण १२ महागड्या गाड्या वापरत असल्याचं उघडकीस आलं आहे. ही सर्व वाहने ते गुंतवणूकदार किंवा भागीदार असलेल्या तीन कंपन्यांच्या नावे आहेत, अशी माहिती पुढे आली. यापैकी दोन मर्सिडीज, एक लॅण्डक्रुजर प्रॅडो गाडी एनआयएने जप्त केली आहे. अन्य नऊ गाड्यांचा वाझे यांनी गुन्ह्यात वापर केला आहे का, याबाबत चौकशी-तपास सुरू आहे, असे एनआयएच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 8:51 am

Web Title: arrested cop sachin waze made to walk near antilia in scene reconstruction sgy 87
Next Stories
1 ‘फास्टॅग नसलेली वाहने बेकायदा म्हणायची का?’
2 विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकात तपासणी
3 तपासात वाझे यांचे सहकार्य नाही; ‘एनआयए’चा दावा
Just Now!
X