30 October 2020

News Flash

पैसे मोजण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्याला अटक

चव्हाण यांनी पुन्हा पैसे मोजले असता यामध्ये अकरा हजार रुपये कमी असल्याचे आढळून आले.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : बँकेत पैसे मोजण्याच्या बहाण्याने एका इसमाला लुबाडणाऱ्या सराईत आरोपीला मानखुर्द पोलिसांनी गुरुवारी अटक केली. फिरोज खान (५६) असे या आरोपीचे नाव असून त्याने आणि त्याच्या एका साथीदाराने अनेकांना फसवल्याची माहिती आहे.

मानखुर्द परिसरात राहणारा राकेश चव्हाण हा इसम बुधवारी सकाळी याच परिसरात असलेल्या एका बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता. पैसे काढल्यानंतर बँकेतच तो पैसे मोजत होता. इतक्यात दोन अनोळखी इसम त्या ठिकाणी आले. या पैशामध्ये एक नोट बनावट असून पुन्हा पैसे मोजून देण्याचा बहाणा करत, या आरोपींनी चव्हाण यांना बोलण्यात गुंतवले. याच दरम्यान हातचलाखी करत, आरोपींनी अकरा हजार रुपये काढून घेत पोबारा केला. चव्हाण यांनी पुन्हा पैसे मोजले असता यामध्ये अकरा हजार रुपये कमी असल्याचे आढळून आले.

आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करत सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून यातील फिरोज खान या आरोपीला आंबिवली येथून गुरुवारी अटक केली. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील विविध पोलीस ठाण्यात १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 1:10 am

Web Title: arresting cheater for money laundering akp 94
Next Stories
1 ‘लोकसत्ता लोकांकिके’तील कलाकाराचे रंगभूमीवर अभिनव प्रयोग
2 हँकॉक पुलाला अंतिम मंजुरी
3 राज्य संस्कृत नाटय़ स्पर्धा : रंगमंचाऐवजी सभागृह; मुंबई विभागीय स्पर्धेतील प्रकार
Just Now!
X