सुमारे २५ वर्षांपूर्वी एका गाजलेल्या प्रकरणामुळे विरार असे म्हटले की अनेकांच्या कपाळावर आठी चढायची, भीतीही वाटायची. मात्र आता ती ओळख पुसली जाऊन, विरार हे मध्यमवर्गीयांची पसंती लाभलेले महत्त्वाचे स्थानक ठरले आहे. हे चित्र केवळ आजचे नाही तर प्राचीन नालासोपाऱ्याला खेटूनच असल्याने अर्थात प्राचीन काळातही विरार हे तत्कालीन लोकांची पसंती लाभलेले ठिकाण होते. याचा ढळढळीत महत्त्वाचा पुरावा म्हणजे जीवदानीचा किल्ला आणि तेथे असलेली लेणी.

आज जीवदानी असे म्हटले की, डोंगरावरची देवी डोळ्यासमोर येते. किंबहुना जीवदानीचा डोंगर हा देवीसाठीच प्रसिद्ध आहे. जीवदानीचा डोंगर विरार रेल्वे स्थानकापासून पूर्वेस सव्वादोन किलोमीटर अंतरावर असला तरी तो दिसू लागतो वसई स्थानक सोडल्यानंतर. पूर्वी केवळ डोंगरवाटेनेच चढाई करावी लागायची. नंतर तिथे पायऱ्यांचा मार्ग बांधण्यात आला, तर आता थेट रोप वेनेदेखील वरती जाता येते.

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’

९०च्या दशकात जीवदानीला गेलो असताना इथे असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीचा काहीसा शिल्लक राहिलेला भाग स्पष्ट दिसत होता. त्याची छायाचित्रेही उपलब्ध आहेत. किल्लय़ाची तटबंदी ही दोन स्तरांवर दिसत होती. त्यातील पहिला भाग हा सध्या उभ्या असलेल्या मंदिराच्या खालच्या बाजूस तर काही भाग हा वरच्या बाजूस होता. वरच्या बाजूस असलेला भाग मोठय़ा प्रमाणावर ढासळलेला होता. त्या वेळेस जीवदानी देवीकडून पुढे गेल्यानंतर मागच्या बाजूस पशुबळी देण्याची प्रथा होती.

सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. एस. नागराजू यांनी त्यांच्या ‘आर्किटेक्चर ऑफ वेस्टर्न इंडिया’ या पुस्तकामध्ये या लेणींची रीतसर नोंद केली आहे. भारतात कुठेही लेणी दिसली की ती पांडवांनीच खोदकाम केल्याचे जनमानसात ठसलेले दिसते, तशीच या लेणींबद्दलही पांडवांनीच ती खोदल्याची वदंता ऐकायला मिळते. नवरात्रामध्ये देवीची जत्रा असते आणि दहाव्या दिवशी विजयादशमीस मोठा उत्सव साजरा होतो.

इथे दोन स्तरांवर लेणींची रचना पाहायला मिळते. वरच्या थरातील लेणी क्रमांक तीनमध्ये प्रत्यक्ष देवीची मूर्ती पाहायला मिळते. त्याआधी दोन लेणी आहेत. त्यातील एक अगदीच छोटेखानी तर दुसरी आकाराने थोडी मोठी आहे. जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना यातील मोठय़ा लेणीचे आकारमान थोडे वाढविण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष देवीची लेणी पाहायला मिळते. त्याला लागूनच एक छोटी लेणी असून, बोळाप्रमाणे असलेल्या या लेणीत रांगतच वरच्या दिशेने जावे लागते. याला श्रीकृष्ण मंदिर असे नाव देण्यात आले असून यामध्ये उजव्या बाजूस केलेल्या खोदकामात सुमारे शतकभरापूर्वीची एक छोटेखानी शिल्पाकृतीही आहे. ही धातूची असून कुणा एका लढवय्याची आहे.

याला लागूनच एक व्हीआयपी खोली आहे. ही खोली म्हणजे पूर्वीची मोठय़ा आकारातील लेणीच आहे. या लेणीचा उल्लेख डॉ. नागराजू यांनी त्यांच्या नोंदीमध्ये पश्चिमेच्या बाजूस तोंड असलेले उघडे लेणे असा केला आहे. शिवाय या परिसरात पश्चिमेच्या बाजूने तुफान पाऊस येत असताना हे लेणे असे उघडे कसे काय, अशी रास्त शंकाही व्यक्त केली आहे. त्याच्या समोरच्या बाजूस तोंड बंद करण्यासाठी काही वापरात असावे, अशी शंकाही ते व्यक्त करतात. त्यासाठीची खाच आज स्पष्ट पाहता येते. या लेणीला बाहेरच्या बाजूने आता दरवाजा लावण्यात आला आहे.

या वरच्या थरातील लेणींकडून वरच्या बाजूस जाताना पाण्याचे एक भले मोठे टाके उजव्या बाजूस येते. ते बाहेरून दिसत नाही. कारण सध्या ते टाके वरच्या बाजूने सिमेंटच्या स्लॅबने बंद करण्यात आले आहे. मात्र पाण्याच्या साठवणुकीसाठी त्याचा वापर आजही केला जातो. सध्या इथे करण्यात आलेल्या पक्षीघरामध्ये हे टाके पाहायला मिळते. पायऱ्या चढून वरच्या बाजूस गेल्यानंतर बारोंडा देवीचे मंदिर आहे. तिथेच बाजूला भद्रकाली व महाकाली मंदिरेही आहेत. व्यवस्थित पाहिले तर असे लक्षात येते की, या मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या दगडी भिंती कातलेल्या आहेत. इथे बारोंडा देवीची मूर्ती प्रतिष्ठापित असली तरी बारोंडा देवीचे मूळ मंदिर इथे शेजारीच असलेल्या डोंगरावर आहे. या दोन्ही डोंगरांच्या मध्ये एक छोटेखानी धरण आहे. महत्त्वाचे म्हणजे बारोंडा देवीदेखील एका लेणीमध्येच वसलेली असून जीवदानी व बारोंडा दोन्ही देवी स्थानापन्न झालेल्या लेणींच्या रचनेमध्ये कमालीचे साम्य आहे. बारोंडा देवीच्या लेणीची प्रथम नोंद सिद्धार्थ काळे या अभ्यासकाने केली.

वरच्या स्तरावर असलेल्या लेणींच्या खालच्या बाजूस आणखी एक लेणीसमूह आहे. यातील दोन लेणींच्या समोरच्या बाजूस मोठे पाण्याचे टाके आहे. दक्षिणेकडून पहिल्या लेणीमध्ये एक चौथरा असून तिथे देवतेची पूजा केली जाते. दुसरी लेणी तुलनेने लहान आकाराची आहे, तर तिसरी लेणी मात्र आकाराने व्यवस्थित मोठी आहे. या परिसरात आदिवासी, कातकरी समाज मोठय़ा प्रमाणावर असून त्यांच्या देवता लाकडामध्ये कोरलेल्या दिसतात. अशा काही देवतांच्या मूर्ती या लेणींमध्ये पाहायला मिळतात.

या दोन्ही लेणीसमूहांची दोन महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. पैकी पहिले म्हणजे मौर्यकालीन खोदकामामध्ये किंवा शिल्पाकृतींमध्ये जसे गुळगुळीत पॉलिश पाहायला मिळते. तसाच गुळगुळीत पृष्ठभाग इथल्या लेणींमध्ये पाहायला मिळतो. यातील व्हीआयपी रूमची लेणी अशा प्रकारे गुळगुळीत होती. मात्र त्याचा पृष्ठभाग आता टाइल्सखाली झाकला गेला आहे. या गुळगुळीत पृष्ठभागामुळे (असा परिणाम भाजे लेणींमध्येही पाहायला मिळतो.) डॉ. नागराजू ही लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करतात. तर दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे इथे इथल्या चार लेणींमध्ये खोदकाम हे अगदी बरोबर काटकोनात म्हणजेच ९० अंशांमध्ये झालेले दिसते. आखीवरेखीव खोदकाम आश्चर्य वाटावे इतके नेटके व नेमके आहे! (पूर्वार्ध)

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab