23 October 2020

News Flash

प्रसिद्ध चित्रकार रामचंद्र कामत यांची आत्महत्या, मुंबईतील घरात बाथटबमध्ये आढळला मृतदेह

पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद

Photo: Instagram

प्रसिद्ध चित्रकार रामचंद्र कामत यांचं निधन झालं आहे. मुंबईमधील माटुंगा येथील घरात बुधवारी ४१ वर्षीय रामचंद्र कामत यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांना घटनास्थावरुन सुसाईड नोटही सापडली असून त्यामध्ये आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास रामचंद्र उर्फ रामइंद्रनिल कामत माटुंग्यातील राहत्या घरी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. यानंतर औषधोपचार करण्यासाठी त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं लिहिलं आहे. रामचंद्र कामत चित्रकारासोबत छायाचित्रकारदेखील होते. माटुंग्यात आपल्या आईसोबत ते राहत होते. पोलिसांनी सुसाईड नोटमध्ये कोणीही जबाबदार नसल्याचा उल्लेख असला तरी आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांचा जबाब नोंदवला जाणार असल्याचं सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 1:54 pm

Web Title: artist ramchandra kamat found dead in his mumbai home sgy 87
Next Stories
1 मिठी नदीखालून मेट्रोचे एकूण तीन किमीचे भुयार
2 मूर्ती लहान, पण मंडप मोठे!
3 नव्या, जुन्या रस्त्यांवर खड्डे
Just Now!
X