25 September 2020

News Flash

‘अॅज बॉईज बिकम मेन’ कादंबरीचे प्रकाशन

आपल्या सरकारी सेवेत मध्यावर असलेला मिहीर एकसुरी आणि रट्याळ कामामुळे कंटाळला आहे.

सरकारी सेवेत करिअरच्या मध्यावर असलेला आणि एकसूरी कामामुळे कंटाळलेला अधिकारी जेव्हा त्याच्या तरुणपणातले दिवस आठवतो आणि सरकारी अधिकारी बनण्यासाठी त्याने केलेल्या कष्टांचे दिवस आठवतो तेव्हा त्याला कसे वाटत असेल, नेमक्या याच भावनेचे चित्रण असलेल्या ‘अ२ बॉईज बिकम मेन’ या कादंबरीचे प्रकाशन बुधवारी झाले. भारतीय रेल्वेच्या सेवेत असलेल्या मुकुल कुमार या अधिकाऱ्याने लिहिलेल्या कादंबरीत सत्यघटनांना दिलेल्या काल्पनिक फोडणीचे मिश्रण आहे. केम्प्स कॉर्नर येथील क्रॉसवर्डस् येथे अभिनेता शर्मन जोशी याच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
आपल्या सरकारी सेवेत मध्यावर असलेला मिहीर एकसुरी आणि रट्याळ कामामुळे कंटाळला आहे. मात्र मनाच्या या अवस्थेत त्याला त्याच्या तरुणपणातील दिवस आठवतात. उदय आणि संदीप या मित्रांबरोबर केलेल्या गमतीजमती, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी घेतलेली मेहनत, सरकारी सेवेत आल्यानंतर समोर आलेली आव्हाने आणि त्यानंतरचा रटाळपणा यांचा ही कादंबरी वेध घेते. मुकुल कुमार हे १९९७च्या तुकडीतील रेल्वे अधिकारी असून सध्या रेल्वे मंत्रालयात कार्यरत आहेत. त्यांनी लिहिलेली ही पहिलीच कादंबरी आहे. कादंबरीचे प्रकाशन शर्मन जोशी यांच्या हस्ते झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 12:19 am

Web Title: as boys become men novel release
Next Stories
1 एसी लोकलचा प्रवास बाऊन्सरच्या देखरेखीखाली
2 गाडय़ा खरेदीसाठी आमदारांना २० लाखांचे कर्ज हवे!
3 मार्डची भूमिका मवाळ
Just Now!
X