अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची पत्नी आशा गवळी (५०) विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. गवळी गँगचे सदस्य ‘मम्मी’च्या नावाने व्यावसायिकाला धमकावून त्यांच्याकडे खंडणी वसुलीसाठी तगादा लावला होता. चौकशीमध्ये ही ‘मम्मी’ दुसरी तिसरी कोणी नसून आशा गवळी असल्याचे समोर आले आहे. अशा गवळी फरार असून तिने खेड सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण सत्र न्यायालयाने तिला तीन दिवसांच्या आत मंचर पोलीस स्थानकात हजर होण्यास सांगितले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. मोबीन मेहम्मूद मुजावर हा भायखळयाच्या दगडी चाळीत राहतो. दुसरा आरोपी सूरज राजेश यादव हा आंबेगाव आणि बाळा सुदाम पाठारे पुणे चंदन नगरमध्ये राहतो. चंदननगरमधील एका व्यावसायिकाला गवळी गँगकडून खंडणीसाठी धमक्या मिळत असल्याने त्याने मंचर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha gawli booked in extortion case
First published on: 25-04-2018 at 12:46 IST