25 October 2020

News Flash

आगीला काँग्रेसचे एफएसआय वाटप कारणीभूत

अशोक चव्हाणांच्या काळात ५०० कोटींचे नुकसान

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार

शेलार यांचा आरोप; अशोक चव्हाणांच्या काळात ५०० कोटींचे नुकसान

अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना मुंबईत आयटी पार्क उभारण्याच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांच्या एफएसआयची खैरात वाटण्यात आली. प्रत्यक्षात आयटी पार्क न उभारता त्या जागांमध्ये हॉटेलसारखा व्यावसायिक वापर करण्यात आला. अशा अनधिकृत हॉटेलांमुळे मुंबईकरांचा जीव धोक्यात आला आहे. काँग्रेसच्या काळात अशा एफएसआय वाटपातून राज्य सरकारचा ५०० कोटी रुपयांचा महसूल बुडाला, असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी रविवारी केला.

काँग्रेस सरकारच्या काळात अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मुंबईत आयटी पार्क उभारण्याच्या नावाखाली एफएसआय वाटण्यात आले. असा एफएसआय वापरून आयटी पार्क न उभारता त्याऐवजी अनधिकृतपणे हॉटेलसारखा व्यावसायिक वापर करण्यात आला. त् एफएसआय वाटप आणि इमारत वापरात बदल करून राज्य सरकारच्या ५०० कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान करून मालकांचा फायदा करून देण्यात आला. त्यामुळे कमला मिलमधील हॉटेलांना लागलेल्या आगींच्या दुर्घटनेला काँग्रेस जबाबदार आहे. याचे उत्तर  अशोक चव्हाण यांनी द्यायला हवे, असे शेलार म्हणाले.

दरम्यान, कमला मिलमधील आगीत १५० ते २०० जणांचे प्राण वाचविणाऱ्या महेश साबळे यांचा शेलार यांनी दादरमधील त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला. साबळे यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला तत्काळ घटनेची माहिती दिली. तसेच २०० जणांना आगीतून सुटका करून घेण्यासाठी मदत केली होती.

बिनबुडाचे आरोप –  चव्हाण

कमला मिल दुर्घटनेला सरकार आणि मुंबई महापालिकेचे भ्रष्ट प्रशासन जबाबदार असून सरकारचे अपयश झाकण्यासाठी आशीष शेलार बिनबुडाचे आरोप करत असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले. आयटी पार्कला सवलती देण्याचे सरकारी धोरण होते. या सवलतींचा कोणी गैरफायदा घेत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मुंबई महापालिका व सरकारने  तीन वर्षांत कारवाई का केली नाही? असा सवाल चव्हाण यांनी केला.

कमला मिलमधील दुर्घटनेनंतर समोर आलेल्या वस्तुस्थितीनुसार या परिसरात बहुतांश उपाहारगृहे कोणत्याही परवानगीविना राजरोसपणे व्यवसाय करत होती. या पाश्र्वभूमीवर गच्चीवरील उपाहारगृहांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करावा          – रवी राजा, विरोधी पक्षनेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 1:23 am

Web Title: ashish shelar comment on congress party
Next Stories
1 सनदी अधिकाऱ्यांसाठी ‘सिडको’च्याही पायघडय़ा
2 कृषीपंपांच्या थकबाकीवर सौरऊर्जा फीडरचा उपाय
3 गाथा शस्त्रांची : प्रस्तावना (पूर्वार्ध)
Just Now!
X