25 April 2019

News Flash

ब्रिटिशांची चापलुसी करणाऱ्यांचे अनुयायी सत्तेवर -चव्हाण

प्रदेश काँग्रेसच्या वतीने गुरुवारी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अशोक चव्हाण ( संग्रहीत छायाचित्र )

मुंबई : स्वातंत्र्यलढय़ाला विरोध करून ब्रिटिशांची चापलुसी करणाऱ्यांचे अनुयायी आज सत्तेवर बसून देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी धारदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जुलमी ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील लढाईप्रमाणेच आजच्या सरकारविरोधात ‘चले जाव’ची लढाई लढावी लागेल, त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रदेश काँग्रेसच्या वतीने गुरुवारी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात स्वातंत्र्यलढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले, तसेच या वेळी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

First Published on August 10, 2018 3:38 am

Web Title: ashok chavan hit maharashtra government