केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे (आयबी) माजी उपसंचालक अशोक कर्णिक (८४)  यांचे गुरुवारी पहाटे वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात मेंदूच्या रक्तस्रावाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. कर्णिक यांनी गुप्तचर वार्ता विभागात ३७ वर्षे सेवा केली होती. निवृत्तीनंतर ते वांद्रे येथे राहात होते. ८ ऑगस्ट रोजी ते घरात कोसळले . त्यांना  लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्या दिवसापासून ते कोमात होते. गुरुवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. गुप्तवार्ता विशेषज्ञ म्हणून कर्णिक यांची ख्याती होती. त्यांनी लिहिलेले ‘इंटेलिजन्स-अ‍ॅन इन्सायडर्स व्ह्य़ू’ हे पुस्तक गाजले होते. या पुस्तकात त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला होता. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.