News Flash

‘एशियाटिक’च्या ग्रंथसंपदेला नवसंजीवनी

सोसायटीची इमारत ऐतिहासिक वारशात गणली जाते.

‘ग्रंथ संजीवनी’ या संकेतस्थळाचे अनावरण

मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये उपलब्ध असलेली विपुल ग्रंथसंपदा वाचकांना आणि अभ्यासकांना एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. एशियाटिक सोसायटीच्या ‘ग्रंथ संजीवनी’ या संकेत स्थळाचे अनावरण सोमवारी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या हस्ते सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात करण्यात आले. यानिमित्ताने मंत्र्यांनी एशियाटिक सोसायटीला भेट देऊन तेथील समस्यांची पाहणी केली.

सोसायटीची  इमारत ऐतिहासिक वारशात गणली जाते.  पण देखभालीअभावी दरवर्षी पावसाळ्यात इमारतीत मोठय़ा प्रमाणात पाणी गळती होते. यामुळे इथल्या ग्रंथसंपदेचे नुकसान होत आहे. उपाय म्हणून दोन वर्षांपूर्वी सोसायटीने पुस्तकांचे ‘संगणकीकरण’ करण्याचा निर्णय घेतला. हे काम शेवटच्या टप्प्यात आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून सोसायटीकडील विविध दुर्मीळ पुस्तके, जुनी वर्तमानपत्रे, नियतकालिके, शासकीय दस्तावेज आणि हस्तलिखिते डिजिटल स्वरूपात अभ्यासूंना उपलब्ध होतील.

अडीच वर्षांत २५,८०० पुस्तकांचे  संगणकीकरण पूर्ण झाले आहे.   संगणकीकरणाच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात तयार करण्यात आलेले साहित्य ‘ग्रंथ संजीवनी’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘ येत्या महिन्याभरात सर्व साहित्यकृती ‘ग्रंथ संजीवनी’वर उपलब्ध होतील,’ अशी माहिती  परवेज बनाटवाला यांनी दिली.

https://granthsanjeevani.com/jspui/about/default.jsp

या संकेतस्थळावर (वेब पोर्टलवर) ८६६८ पुस्तके, ३५१८६ जुनी वर्तमानपत्रे, १०२१ शासकीय दस्तावेज, ६९१७ नियतकालिके आणि १९११ हस्तलिखिते उपलब्ध आहेत.

शर्मा यांना सोसायटीतील सदस्यांनी समस्या सांगितल्या. या वेळी केंद्र आणि राज्य शासनाकडून सोसायटीच्या मिळणाऱ्या वार्षिक अनुदानात वाढ करण्याची मागणी सोसायटीचे अध्यक्ष शरद काळे यांनी केली.  इमारतीच्या संवर्धनाच्या दृष्टीने सांस्कृतिक मंत्रालयातर्फे १५ ऑक्टोबर २०१४ रोजी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालामध्ये पन्नास कोटी रुपयांचे अनुदान देण्याची शिफारस करण्यात आली होती. यातील ३० कोटी हे सांस्कृतिक मंत्रालयाकडून तर २० कोटी हे महाराष्ट्र शासनाकडून देण्यात यावेत असेही समितीने म्हटले होते. मात्र सांस्कृतिक मंत्रालयाने केवळ ५ कोटी रुपये दिले असून महाराष्ट्र शासनाने अजूनही अनुदानाबाबत भाष्य न केल्याची माहिती कार्यक्रमावेळी काळे यांनी दिली.  याबाबत सांस्कृतिक मंत्रालयाकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे  आश्वासन डॉ. महेश शर्मा यांनी दिले.

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प काही दिवसांवर आला असल्याने त्यामधून सोसायटीच्या संवर्धनाकरिता आणि विकासाच्या दृष्टीने चांगले काहीतरी घडेल.

डॉ. विनय सहस्रबुद्धे, अध्यक्ष, इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 4:00 am

Web Title: asiatic library granth sanjeevani
Next Stories
1 खासगी शिकवण्यांसाठीच्या प्रस्तावित अटी शिथिल?
2 स्वच्छता पथकाचा ‘गनिमी कावा’
3 रेल्वे पोलीस दलातही आठ तास ‘डय़ुटी’
Just Now!
X