News Flash

मुंबई – उदयोन्मुख अभिनेत्रीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या

पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत

बॉलिवूडमध्ये संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका उदयोन्मुख अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंधेरीतील ओशिवारा येथे ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन तिने आत्महत्या केली. पर्ल पंजाबी अशी तिची ओळख पटली आहे. चित्रपटांमध्ये संधी मिळावी यासाठी गेल्या अनेक काळापासून ती प्रयत्न करत होती. मात्र तिला संधी मिळाली नव्हती असं पोलिसांनी सांगितलं आहे.

इमारतीचा सुरक्षा रक्षक बिपीन कुमार याने दिलेल्या माहितीनुसार, “रात्री १२.१५ ते १२.३० दरम्यान ही घटना घडली. काहीतरी आवाज सुरु होता. मला वाटलं कोणीतरी रस्त्यावर आरडाओरड करत आहे. काय झालं आहे हे मी पाहण्यासाठी गेलो होतो. परत आलो तेव्हा पंजाबी राहत असलेल्या तिसऱ्या माळ्यावरुन आवाज ऐकू येत होता”.

“पंजाबी मानसिक तणावात होती. आईसोबत तिचं वारंवार भांडण होत असेल. याआधीही दोन वेळा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:57 pm

Web Title: aspiring actress commits suicide in mumbai sgy 87
Next Stories
1 आमदारांचे प्रगतीपुस्तक: मुंबईकरांनो जाणून घ्या तुमच्या आमदारांना किती गुण मिळाले
2 भाजपापेक्षा शिवसेनेच्या आमदारांची कामगिरी सरस पण काँग्रेसच अव्वल
3 गणेशोत्सवात लालबागला येताय?.. या दोन हॉटेल्सना नक्की भेट द्या
Just Now!
X