21 September 2020

News Flash

‘अस्वस्थ वर्तमान’ कादंबरीस यंदाचा जयवंत दळवी स्मृती पुरस्कार

मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या जयवंत दळवी स्मृती पुरस्कारासाठी आनंद विनायक जातेगावकर लिखित ‘अस्वस्थ वर्तमान’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.

| September 1, 2014 01:58 am

मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या जयवंत दळवी स्मृती पुरस्कारासाठी आनंद विनायक जातेगावकर लिखित ‘अस्वस्थ वर्तमान’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. ११ हजार १११ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाच्या वर्षीचा पुरस्कार ‘कादंबरी’या वाङ्मय प्रकारासाठी देण्यात आला आहे.
प्रा. दीपक घारे, निलिमा भावे, प्रा. जयप्रकाश लब्धे यांच्या निवड समितीने जातेगावकर यांच्या उपरोक्त कादंबरीची निवड केली आहे. ही कादंबरी शब्द प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. दळवी यांच्या स्मृतिदिनी १६ सप्टेंबर रोजी दादर सार्वजनिक वाचनालय, धुरु हॉल, पहिला मजला येथे होणाऱ्या कार्यक्रमात जातेगावकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 1:58 am

Web Title: aswasth vartman novel gets jaywant dalvi award
Next Stories
1 विजेच्या धक्क्य़ाने कुर्ला येथे एकाचा मृत्यू
2 नॅशनल पार्कजवळ चिमुरडीची बलात्कार करून हत्या
3 भाभा रुग्णालयात जमावाचा धुडगूस
Just Now!
X