दररोज सुमारे दोन हजार रुग्णांची नोंद

मुंबई : सप्टेंबर महिन्यापासून मुंबईतील रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असली तरी त्यात मोठय़ा संख्येने लक्षणे नसलेले रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांमध्येही बहुतांश रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत.

सप्टेंबरपासून पालिकेने चाचण्यांची संख्या वाढवली असून दररोज सुमारे दोन हजार रुग्णांची भर पडते आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्याही वाढते आहे. मात्र त्यात लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. मुंबईत १२ सप्टेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या २९,१३१ होती. त्यापैकी २०,३३३ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. एकूण बाधितांच्या तुलनेत ही संख्या १२ टक्के आहे. तर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ७,४७७ असून एकूण बाधितांच्या तुलनेत ही संख्या ४ टक्के आहे.

लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे पालिकेच्या करोना उपचार केंद्रात मोठय़ा संख्येने खाटा रिकाम्या आहेत. तसेच रुग्ण सापडण्याचे प्रमाण इमारतीत जास्त असल्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाते. त्यामुळे करोना उपचार केद्रातील खाटा रिक्त राहात आहेत.

   सुविधा                               एकूण खाटा                     रिक्त

भव्य करोना उपचार केंद्रातील एकूण खाटा        १५,९६४                         ५७६४

अतिदक्षता खाटा                                              १४१७                             ८८

ऑक्सिजन खाटा                                              ७८५२                             २८६५

कृत्रिम श्वसन उपकरण खाटा                           ९४७                                 ५६

 

सक्रिय रुग्ण                 २९,१३१

लक्षणे नसलेले रुग्ण     २०,३३३

१२ टक्के

लक्षणे असलेले रुग्ण     ७४७७

४ टक्के

गंभीर                          १३२१

१ टक्का