मरीन लाईन्सच्या तारापोरवाला मत्स्यालयावजळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या  महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. दिपाली लाहामाटे (२५) असे या महिला डॉक्टरचे नाव असून तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मंगळवारी २४ मार्च रोजी हा भीषण अपघात घडला. दिपाली भावाच्या पदवीनदान समारंभासाठी रस्ता ओलांडून जेजे जिमखान येथे जात असताना हा अपघात घडला. दिपालीच्या भावाला एमबीबीएसची पदवी मिळणार होती.

दंतवैद्यक शास्त्रात पदवी मिळवणारी दिपाली नायर रुग्णालयात इंटर्नशिप करत होती. या अपघातात दिपालीच्या डोक्याला मार लागला होता. नेपियन सी रोड येथे राहणाऱ्या शिखा झवेरी यांच्या गाडीने दिपालीला उडवले. शिखा पेशाने शिक्षिका असून अपघाताच्यावेळी त्या स्वत: गाडी चालवत होत्या. त्यांची मुलगी शेजारच्या सीटवर बसला होता.

दुपारी ३.३० ते ४ च्या दरम्यान दिपाली लाहामाटे टॅक्सीतून उतरुन रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला. धडक दिल्यानंतर शिखा झवेरी थांबल्या नाहीत त्या लगेच गाडी घेऊन पळाल्या. पण त्याचवेळी सर्तक असलेल्या एका बाईकस्वाराने पाठलाग करुन त्यांना गाडी थांबवायला भाग पाडली. मरीन लाईन्स पोलिसांनी शिखा झवेरीला अटक केल्यानंतर जामिनावर सोडून दिले.

स्थानिकांनी दिपालीला नजीकच्या भाटिया रुग्णालयात दाखल केले. आतापर्यंत उपचाराचे दोन लाख रुपये बिल झाले असून दिपालीला जेजे रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. गाडीने ठोकर दिली तेव्हा दिपाली फोनवर बोलत होती असे मरीन लाईन्स पोलिसांनी सांगितले. दरम्यान शिखा झवेरींची जामिनावर सुटका झाली आहे. जामीन पात्र गुन्हा असल्याने शिखा यांना जामीन मिळाला असे पोलिसांनी सांगितले.