राज्यात १३ जिल्ह्य़ांमध्ये केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना राबविण्याचा निर्णय  मंत्रिमंडळ बैठकीत  घेण्यात आला. या जिल्ह्य़ातील ७३ पाणलोट क्षेत्र, १३३९ ग्रामपंचायतीमधील १४४३ गावांमध्ये ही योजना राबविण्यात येईल.

भुजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांद्वारे तसेच जल संधारण व कृषी विभागाकडील सूक्ष्म सिंचनाच्या उपाययोजनांद्वारे भुजल पातळीमध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. पाण्याच्या अनियमित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

liquor
परमीट रुममधील ‘मद्य’भेसळ आटोक्यात येणार! तपासणी यंत्र खरेदीसाठी शासनाची मान्यता
lok sabha election 2024, nagpur district collector, offices, education institutes
लोकसभा निवडणुकीसाठी मनुष्यबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला ६७० कार्यालय-शाळांचा खो
Voting facility for Mumbai Thane Pune residents only in societies Pune news
मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय
Urban Planning Exam marathi news
नगर रचना विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी

दरम्यान सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होईपर्यंत संस्थेस नफ्याच्या कोणत्याही भागाचा विनियोग करता येणार नाही. त्याचप्रमाणे सभासदांना दसरा-दिवाळीपूर्वी लाभांश देणे, पुढील वर्षांच्या आर्थिक पत्रकास मंजुरी देणे, लेखा परीक्षकाची नियुक्ती करणे याबाबत देखील कायद्यात सुधारणा करण्यास व अध्यादेश काढण्यास  मान्यता देण्यात आली आहे.

शाळांना वाढीव अनुदान

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण २१६५ शाळांना २० टक्के व याआधीच २० टक्के अनुदान घेणाऱ्या २४१७ शाळांना अतिरिक्त २० टक्के अनुदान १ नोव्हेंबर २०२० पासून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सहकार कायद्यात सुधारणा

करोनामुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होणे शक्य नसल्याने संस्थेतील महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्याचे सर्वाधिकार संचालक मंडळास देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र त्यांनतही या सभा होतील की नाही याची शाश्वती नसल्यामुळे सर्वसाधारण सभेचे अधिकार संचालक  मंडळास देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. संस्थेमधील शिल्लक रकमेच्या विनियोगाचे अधिकार, पुढील वर्षांच्या आर्थिक पत्रकास मंजुरी देणे व लेखापरीक्षकाची नेमणूक करणे अशा महत्त्वाच्या विषयांना वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजूर करण्याऐवजी मंजुरीचे अधिकार संचालक मंडळास देण्याचा तसेच  या निर्णयांना येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.