ATS अर्थात अँटी टेरिरीझम स्क्वॉडने नालासोपारा येथून पाच बांगलादेशींना अटक केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते भारतात रहात होते अशीही माहिती मिळते आहे. या सगळ्यांची चौकशी आता करण्यात येते आहे असेही समजते आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. हे पाचजण कोण आहेत? त्यांची नावं काय हे अद्याप समजू शकलेले नाही. या सगळ्यांची कसून चौकशी सुरु आहे.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातही नालासोपारा येथून सहा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. परदेशी नागरिक अधिनियम कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. आता त्याचप्रमाणे पुन्हा एकदा यावर्षीही पाच बांगलादेशींना नालासोपारा येथून अटक करण्यात आली आहे. एटीएसने ही कारवाई केली आहे.