पुणे, सातारा, मुंबई, सोलापूर आणि नालासोपारा या ठिकाणी घातपात होणार होता जो उधळण्यात एटीएसला यश आले आहे. तसेच सुधन्वा गोंधळेकरलाही अटक करण्यात आले आहे. नालासोपारा येथे जी कारवाई करण्यात आली जिथे तिघांना अटक करण्यात आली. सुधन्वा गोंधळेकर शिवप्रतिष्ठान या संबंधित आहे याचीही माहिती समोर आली आहे. सुधन्वा गोंधळेकरला एटीएसने अटक केली आहे. शिवप्रतिष्ठान ही संभाजी भिडे यांची संस्था आहे हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. सुधन्वा गोंधळेकर आमच्याशी गेल्या चार वर्षांपासून संबंधित नाहीत असे नितीन चौगुले यांनी म्हटले आहे. वैभव राऊत, शरद काळसकर हे दोघे नालासोपारा येथील आहेत, तर सुधन्वा गोंधळेकर मूळचे सातारा येथील रहिवासी या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. सुधन्वा गोंधळेकर हे संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

नालासोपाऱ्यातून वैभव राऊतला अटक केल्यानंतर आणखी दोघांनाही एटीएसने अटक केली आहे. शरद काळसकर सुधन्वा गोंधळेकर या दोघांना वसईतून अटक करण्यात आली आहे. या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर या सगळ्यांना १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी एटीएसने केली. या तिघांनाही १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही असे सनातनने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे सुधन्वा जोगळेकरशी चार वर्षांपासून संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानचा संबंध आलेला नाही असेही स्पष्ट करण्यात आले. आता या प्रकरणात आणखी काय काय घडते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.