News Flash

हिरेन मृत्यू प्रकरणात ‘एटीएस’कडून दोन निरीक्षकांची चौकशी

चौकशी झालेल्या अन्य अधिकाऱ्याचे नाव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घेतले होते

(संग्रहित छायाचित्र)

व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबई आणि ठाणे गुन्हे शाखेतील दोन पोलीस अधिकाºयांची चौकशी केली.

एटीएसच्या वरिष्ठ  अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक तपासात ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकु मार कोथमिरे आणि मुंबई गुन्हे शाखेच्या कांदिवली कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या संशयास्पद हालचाली आढळल्या. या दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ४ मार्चच्या रात्री तावडे नावाच्या अधिकाऱ्यास भेटण्यासाठी घोडबंदर येथे जातो, असे सांगून घरातून निघालेले मनसुख बेपत्ता झाले. दुसऱ्या दिवशी मुंब्रा खाडीत, रेती बंदर येथे त्यांचा मृतदेह सापडला. मनसुख यांच्या पत्नाी विमला यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर संशय व्यक्त केला.

चौकशी झालेल्या अन्य अधिकाऱ्याचे नाव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घेतले होते. हे दोन्ही अधिकारी वाझे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.

एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांना विचारले असता त्यांनी या दोन अधिकाºयांची चौकशी करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:37 am

Web Title: ats interrogates two inspectors in hiren death case abn 97
Next Stories
1 ‘लोकसत्ता तरुण तेजांकितां’ची आज घोषणा
2 सेवा करदात्यांवर अविश्वास
3 ‘रेमडेसिवीर’च्या किमतीत घट