१९९३ सालच्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी मुस्तफा डोसा याच्या कारागृहातील बेकायदा कारवायांबाबत आपण तक्रार केल्यानेच आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा दावा गुंड अबू सालेम याने शुक्रवारी मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर केला.
हल्ल्याच्या दिवशी डोसाने सुरुवातीला आपल्याला शिवीगाळ केली व त्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला केला. चमच्याचे धारदार शस्त्रात त्याने रुपांतर केले होते, असे सालेम म्हणाला.