News Flash

ठाण्यात मनसेच्या महिला शहरअध्यक्षावर प्राणघातक हल्ला

समीक्षा मार्कंडे यांच्यावर ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंजवडीतील लक्ष्मी चौकात महिला इंजिनिअरचा अपघाती मृत्यू

ठाण्यातील मनसेच्या महिला शहर अध्यक्षा समीक्षा समीर मार्कंडे यांच्यावर मंगळवारी संध्याकाळी प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मार्कंडे यांच्यावर ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

ठाण्यातील मनसेच्या महिला शहराध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांच्यावर बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. मार्कंडे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करण्यात आला.  घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. दोन हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. समीक्षा मार्कंडे या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही वेळातच त्यांना तिथून एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या समीक्षा मार्कंडे यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी अद्याप हल्ल्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. ठाणे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

ठाण्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर एका पदाधिका-यावर हल्ला झाला आहे. हा हल्ला राजकीय वादातून झाला की पूर्व वैमनस्यातून झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. निवडणुकीच्या मैदानात उतरु नका अशी धमकी एक हल्लेखोर देत होता असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. मात्र पोलिसांकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. समीक्षा यांचे पती हे एका इंग्रजी वृत्तपत्रात छायाचित्रकार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2016 9:36 pm

Web Title: attack on mns leader in thane
Next Stories
1 बाळगंगा धरण घोटाळ्याप्रकरणी तीन जणांना अटक
2 ‘मनसेच्या ५ कोटींच्या मागणीला माझा विरोधच होता, पण निर्मात्यांनीच ती मान्य केली’
3 मुंढेंना महापालिकेत येण्यास मज्जाव करा, महापौरांचे पोलीस आयुक्तांना साकडे
Just Now!
X