News Flash

काँग्रेस नगरसेवक शिवा शेट्टी यांच्यावर हल्ला

काँग्रेस नगरसेवर शिवा शेट्टी यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी गोराई येथे हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी शिवराम पाटील आणि

| December 7, 2013 02:14 am

काँग्रेस नगरसेवर शिवा शेट्टी यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी गोराई येथे हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी शिवराम पाटील आणि त्यांच्या दोन मुलांना अटक केली आहे.  शेट्टी हे गोराईच्या प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक आहे. गोराईच्या सायली महाविद्यालयात विद्यार्थ्यांची भांडणे सुरू होती. ती सोडविण्यासाठी शेट्टी गेले होते. त्यावेळी ४ च्या सुमारास शिवराम पाटील यांनी शेट्टी यांच्यावर बांबूने हल्ला केला. या भागात शिवराम पाटील यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. त्याची तक्रार केल्यामुळे सूडापोटी मारहाण करण्यात आल्याची शेटट्ी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान शिवराम पाटील यांनी या प्रकरणात आपला संबंध नसून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:14 am

Web Title: attacks on congress corporator shiva shetty
Next Stories
1 इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन पदपथावरच उरकले
2 आरोग्य खात्यातील कंत्राटी डॉक्टरांना अपघात विमाकवच
3 प्रीती राठी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा नव्याने करणार
Just Now!
X