News Flash

पालिका निवडणुकीसाठी अतुल भातखळकर प्रभारी

‘भाजप येणार, मुंबई घडविणार’ अशी साद भाजपकडून मुंबईकरांना घातली जाणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई महापालिकेवर झेंडा फडकविण्याचा निर्धार केलेल्या भाजपने आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई भाजप कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली असून कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर सत्ता आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘भाजप येणार, मुंबई घडविणार’ अशी साद भाजपकडून मुंबईकरांना घातली जाणार आहे. शिवसेनेची भ्रष्टाचारी सत्ता हटविण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:14 am

Web Title: atul bhatkhalkar in charge for municipal elections abn 97
Next Stories
1 ट्रक, बसच्या टोलमध्ये दहा टक्के वाढ
2 दीड हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द!
3 सिंचन घोटाळ्यातील अधिकाऱ्याची महत्त्वाच्या पदावर वर्णी
Just Now!
X