06 July 2020

News Flash

‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये आज पर्यावरणावर मंथन

आज सायंकाळी ५ वाजता हा विशेष वेबसंवाद होईल.

संग्रहित छायाचित्र

पर्यावरणात होत असणारे नैसर्गिक बदल, त्यातच वाढलेला मानवी हस्तक्षेप आणि पुढील काळात उद्भवणारे संकट अशा पर्यावरणाच्या पेचाचा अर्थ कसा लावायचा यावर ‘लोकसत्ता विश्लेषण’ या विशेष वेबसंवादात आज, (४ जून) पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर मार्गदर्शन करतील.  गेल्या काही वर्षांत पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप वाढला आहे.  टाळेबंदीच्या काळात हवेचे प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी झाल्याने मानवाची पर्यावरणातील ढवळाढवळ स्पष्टपणे दिसून आली. या सर्वातून ‘विकास की पर्यावरण’ असा तिढादेखील निर्माण होतो. या सर्व मुद्यांच्या अनुषंगाने  जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज सायंकाळी ५ वाजता हा विशेष वेबसंवाद होईल.

सहभागी होण्यासाठी..  https://tiny.cc/LS_Vishleshan_4June या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडीवर संदेश येईल. त्यानंतर या वेबसंवादात भाग घेता येईल. अधिक माहितीसाठी  https://www.loksatta.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 12:22 am

Web Title: atul deulgaonkar an environmental expert in loksatta vishleshan today abn 97
Next Stories
1 रेल्वेचे विलगीकरण डबे अद्यापही ‘अलगीकरणा’त
2 वादळामुळे विमान फेऱ्यांवर परिणाम, रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
3 वीज पुरवठय़ावरही परिणाम 
Just Now!
X