15 July 2020

News Flash

‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये अतुल देऊळगावकर 

पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला वेबसंवाद

संग्रहित छायाचित्र

पर्यावरणाची सद्यस्थिती आणि पर्यावरण ऱ्हासाची आव्हाने या ज्वलंत विषयावर जागतिक पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकसत्ता विश्लेषण’ या विशेष वेबसंवादात यंदा विख्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे विचार आणि विश्लेषण ऐकण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रश्न ही गेल्या काही वर्षांत मानवापुढील सर्वात उग्र समस्या बनत चालली आहे. या विषयावर जागतिक स्तरावर सातत्याने मंथन होत आहे. उपायांच्या बाबतीत निव्वळ सरकारी प्रयत्न पुरेसे नाहीत, तर पर्यावरण संवर्धन ही सर्वाचीच जबाबदारी ठरते. कारण पर्यावरणविषयक प्रश्नांनी सर्वसामान्यांचे जीवनदेखील व्यापले आहे. करोनोत्तर काळात पर्यावरणांच्या प्रश्नांचे स्वरूपदेखील बदलणार आहे. या व अशा अनेक मुद्दय़ांच्या अनुषंगाने ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ४ जूनला गुरुवारी हा विशेष वेबसंवाद होईल.

‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये यापूर्वी अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांनी कोविडकालीन २० लाख कोटींच्या केंद्रीय आर्थिक मदतीचे विश्लेषण केले होते. तर मधुमेह तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांचे कोविडच्या काळात आणि एरवीही मधुमेहाच्या आव्हानाबाबत मार्गदर्शन लाभले होते.

सहभागी होण्यासाठी..  https://tiny.cc/LS_Vishleshan_4June या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडीवर संदेश येईल. त्यानंतर या वेबसंवादात भाग घेता येईल. अधिक माहितीसाठी  https://www.loksatta.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 12:21 am

Web Title: atul deulgaonkar in loksatta vishleshan abn 97
Next Stories
1 कुलगुरूंची शिफारस डावलून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
2 १५ दिवसांत सात लाख ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
3 शिवसेनेच्या शाखांमध्ये दवाखाने
Just Now!
X